Anna Hazare : नगर : ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा (Lokayukta Act) नको होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वेळ लावला पण कायदा केला. हे विधेयक मंजूर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा : हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्लाप्रकरणी ६० आमदारांनी विधानसभेत उठवला आवाज; देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागले उत्तर
देशातील भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित असलेला लाेकायुक्त विधेयक कायदा महाराष्ट्र विधान परिषदमध्ये नुकताच मंजूर झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. हे विधेयक मंजूर केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा : खाटिक गल्ली झाली शरीफ गल्ली; महापालिकेने जातीवाचक ३७ ठिकाणांची नावे बदलली
लोकपाल विधेयक ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक २०१३ असे देखील संबोधतात. देशातील भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे. ज्यामध्ये लोकपालाच्या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद केली आहे. ज्यामध्ये काही सार्वजनिक संस्थांविरुद्ध ठेवलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका आणि त्यासंबंधित घटकांची चौकशी केली जाईल.