Anna Hazare : नगर : ”जीवनात देशरक्षणाचे ध्येय उराशी बाळगून सैन्यामध्ये (army) भरती होत देशसेवा केली. वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा देशाच्या कल्याणासाठी काम करण्याची उर्मी आहे. देशाच्या मातीने आपल्याला सर्वस्व दिले. त्या देशाचा विसर पडू न देता प्रत्येकाने देशसेवा (national service) करावी, असे आवाहन पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केले.
हे देखील वाचा : आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन २०२३ निधीचा प्रारंभ पद्मभूषण अण्णा हजारे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे आदी उपस्थिती हाेते.
नक्की वाचा : NCP : ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकारणीचा लवकरच विस्तार; आगामी निवडणुकांसाठी निवडी ठरणार महत्त्वपूर्ण
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, ”प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या समर्पणामुळेच देशाच्या सुरक्षितेबरोबरच अखंडता अबाधित आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने सढळ हस्ते मदत करावी. ध्वजदिन निधी संकलनासाठी चालू वर्षात पाच कोटी रुपयांचे ध्वजदिन निधीचे संकलन करुन नगर जिल्हा संपूर्ण राज्यात निधी संकलनामध्ये अग्रेसर रहावा.”