Anna Hazare: पारनेर : तालुक्यातील निघोज (Nighoj) मधील वेताळबाबा क्रीडांगणावर (Vetal Baba Play Ground) उद्याचे राष्ट्रीय खेळाडू (National Player) घडतील. समाजाने मुलांवर चांगले संस्कार करावेत.आपले आचार, विचार चांगले ठेवावेत ज्यातून उद्याची आशावादी तरुण पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले आहे.
नक्की वाचा : ग्रंथ प्रदर्शनाला पारनेरकरांचा उदंड प्रतिसाद
निघोज (ता.पारनेर) येथे लोकसहभागातून व आजी माजी सैनिकांच्या प्रेरणेने गावातील लहान मुलांच्या व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी भव्य अशा क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली. त्याचे लोकार्पण पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना हजारे म्हणाले, या क्रीडांगणावर उद्याचे राष्ट्रीय खेळाडू तयार होतील. वेताळबाबा क्रीडांगण आरोग्य मंदिर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.अपमान पचविण्याची ताकद निर्माण करून,जगायच तर समाजासाठी असा संदेशही त्यांनी तरुणांना दिला.
अवश्य वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन
यावेळी युवा व्याख्याते राहुल गिरी यांनी स्वामी विवेकानंद व आजची मोबाईल ग्रस्त पिढी व पालकांनी घ्यायची काळजी यावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चित्रा वराळ होत्या. वराळ यांनी गावच्या प्रथम नागरिक या नात्याने सहकार्य करणाऱ्या दानशूर ग्रामस्थांचे, मुंबईकर मंडळींचे व आजी माजी सैनिक संघटनेचे आभार मानले. सेवानिवृत्त कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विकास वराळ यांनी आभार मानले.
यावेळी कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, पत्रकार अमोल खिलारी, बाळासाहेब लामखडे,रामदास वरखडे, शिवाजी वराळ,पोपट लंके, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे,सोमनाथ वरखडे, मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, सेवानिवृत्त मेजर विकास वराळ, अमोल ठुबे, सरपंच पंकज कारखिले, सचिन वराळ,अस्लम इनामदार, सुनील पवार, युवा व्याख्याते राहुल गिरी, ग्रामस्थ, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Anna Hazare