Anna Hazare : नगर : एकीकडे कथित दारु घाेटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केली. दुसरीकडे ज्या केजरीवालांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याबराेबर भ्रष्टाचाराविराेधात लढाई केली. ते अण्णा हजारे अशावेळी कुठे आहेत, ते कुठे हरवले आहेत, हजारे यांना पहिलं जागं करा, असा खाेचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
हे देखील वाचा: नगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
विरोधक आक्रमक
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला. ११ वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले असता. त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल पण होते. त्यानंतर ते गेले तीन टर्म दिल्लीच्या सत्तास्थानी आहेत.
नक्की वाचा: ‘या’ निवडणुका न घेतल्याने एक प्रकारे लाेकशाहीची हत्या; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
कुठे आहेत ते? (Anna Hazare)
केजरीवाल यांची पंजाब, दिल्लीच नाहीतर संपूर्ण देशात त्यांची पार्टी आहे. त्यांनी अण्णा हजारे बरोबर भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली आणि आज त्याची पार्टी वाढत आहे. अण्णा हजारे यांना पहिले जागा करा, कुठे आहेत ते? मला माहीत नाही. एकेकाळी त्यांचे आंदोलन होते अशा विषयांवर. आता कुठे हरवले आहेत, असा टोला ही राऊत यांनी हाणला आहे.