Anna Hazare Agitation: मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार 

0
Anna Hazare Agitation:मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार 
Anna Hazare Agitation:मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार 

Anna Hazare Agitation : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. दुसरीकडे याच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hazare) पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत आणि लोकायुक्त कायद्यासाठी लढा उभारणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र (Letter) लिहिले. या पत्रात लोकाआयुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचे सांगत थेट उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. 

नक्की वाचा: अक्षय खन्नाच्या धुरंधर मधील ‘त्या’ व्हायरल गाण्यामागचा किस्सा नेमका काय ?  

अण्णा हजारे पुन्हा करणार आमरण उपोषण  (Anna Hazare Agitation)

राज्य सरकारकडून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ३० जानेवारी २०२६ पासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात ते उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र सरकारने २८ डिसेंबर २०२२ ला विधानसभेत आणि १५ डिसेंबर २०२३ ला विधानपरिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर केले आहे. मात्र, तब्बल २ वर्षे होऊन देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अण्णा हजारे उपोषण करणार आहेत. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसून सरकारची इच्छा दिसत नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचंही अण्णांनी पत्रात म्हटलं आहे.

अवश्य वाचा: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

तपोवनातील वृक्षतोडीवर अण्णांची भूमिका स्पष्ट (Anna Hazare Agitation)

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्ष तोडली जाणार आहेत. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.