Anna Hajare:मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक

0
Anna Hajare:मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक
Anna Hajare:मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक

Anna Hajare : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan singh) यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन (Death) झालं आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hajare) त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.    

नक्की वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन  
अण्णा हजारेंनी मनमोहन सिंग यांच्याबाबत भावना व्यक्त करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ते म्हणाले की,“प्रत्येकजण या जगात येत असतो, जात असतो. कोण आलं, कोण गेलं हे फारसं कुणाला कळत नाही. पण काही लोक असे असतात, जे आपल्या आठवणी कायम मागे ठेवून जातात. समाजात काहीतरी करून जातात. आपला ठसा उमटवून जातात. मनमोहन सिग हे नेहमी देशाबाबत विचार करायचे. त्यामुळेच या देशाची अर्थव्यवस्था बदलली, त्यात मनमोहन सिंग यांचं फार मोठं योगदान आहे”,असं अण्णा हजारे म्हणाले.

‘मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था बदलली’ (Anna Hajare)

“मनमोहन सिंग यांनी पूर्ण देशाची अर्थव्यवस्था बदलली. या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळाली. आजही आपला देश प्रगतीपथावर चालत आहे. तेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आंदोलन करत होतो. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते. दिल्लीत दोनदा त्यांच्या घरी बैठका झाल्या आणि त्यांनी तेव्हा तातडीने निर्णय घेतले”, अशा शब्दांत अण्णा हजारेंनी आंदोलनावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

“आठवणींच्या रुपात ते कायम जिवंत राहतील” (Anna Hajare)

“समाज आणि देशासाठी आस्था, प्रेम असेल तर किती चांगलं काम करता येतं हे मनमोहन सिंग यांच्या उदाहरणावरून दिसत आहे. मनमोहन सिंग आज शरीरानं गेले आहेत, पण आठवणींच्या रुपात ते कायम जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो”, असं अण्णा हजारे म्हणाले.

अवश्य वाचा : आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मनमोहनसिंग यांनी देशाला वाचवलं;शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली   


मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यावेळी अण्णा हजारे यांनी २०११ साली सिंग सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन छेडलं होतं. दिल्लीच्या आझाद मैदान व रामलीला मैदानावर अण्णा हजारे व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here