Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा – फिरते अन्नछत्रालय

Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा - फिरते अन्नछत्रालय

0
Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा - फिरते अन्नछत्रालय
Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा - फिरते अन्नछत्रालय

Annachatralay : अहिल्यानगर : कोरोना (Coronavirus) संकट काळानंतर अहिल्यानगर शहरात अनेक बदल झाले. यात काही विघातक तर काही विधायक होते. अहिल्यानगर शहरातील गरजू, कष्टकरी श्रमिकांसाठी विधायक असा बदल श्री महावीर प्रतिष्ठानच्या (Shree Mahavir Pratishthan) संकल्पनेतून तसेच प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या श्री शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation), आय लव्ह नगरच्या (I Love Nagar) सहकार्यातून घडला. फिरते अन्नछत्रालय या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील गरजूंना अवघ्या १० रुपयांत पोटभर पौष्टिक जेवण मिळत आहे. आत्तापर्यंत चार लाख पाच हजार फूड पॅकेटचे वाटप फिरते अन्नछत्रालयाच्या (Annachatralay) माध्यमातून झाले आहे.

कोरोना संकटकाळात गरजूंसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न

कोरोना संकटकाळात शहरातील गरजूंसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न सोडविण्यासाठी श्री महावीर प्रतिष्ठानने १५ ऑगस्ट २०२० रोजी चांदसुलताना हायस्कूल समोर १० रुपयांत फूड पॅकेट उपलब्ध करून देणारा सामाजिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची माहिती उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना मिळाली. त्यांनी अन्नछत्रालय या उपक्रमाचा आर्थिक भार आपल्या खांद्यावर घेतला. पुढे कोविड संकटकाळ वाढू लागला तशी शहरातील विविध भागांतून अन्न छत्रालय सुरू करण्याची मागणी वाढत गेली. त्यानुसार नरेंद्र फिरोदिया यांनी महावीर जयंतीचे औचित्य साधत २६ एप्रिल २०२१ रोजी फिरते अन्न छत्रालय उपक्रमासाठी एक मोठे वाहन उपलब्ध करून दिले. हे वाहन ठराविक वेळेला ठराविक थांब्यांवर गरजूंना अवघ्या १० रुपयांत फूड पॅकेट उपलब्ध करून देते. हा उपक्रम आजतागायत सुरू आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्ह्यातील रुग्णालयांत येणारे गरजू हे फूड पॅकेट घेतात.  

Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा - फिरते अन्नछत्रालय
Annachatralay : अहिल्यानगरमधील गरजूंची जीवनरेखा – फिरते अन्नछत्रालय

अन्न छत्रालयातून दररोज ३०० ते ४०० फूड पॅकेटचे वाटप (Annachatralay)

या उपक्रमासाठी एक फूड पॅकेट तयार करण्यासाठी ४० रुपये खर्च येतो. या फूड पॅकेटमध्ये एक भाजी, दोन चपात्या, डाळभात व चटणी दिली जाते. महावीर केटर्सचे अमित पटवा व रुपेश पटवा हे फूड पॅकेट तयार करतात. अन्न छत्रालयातून दररोज ३०० ते ४०० फूड पॅकेट गरजूंना दिली जातात.