Annasaheb Patil Economic Development Corporation : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत २७ कोटी ९६ लाखांचे वितरण

Annasaheb Patil Economic Development Corporation : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत २७ कोटी ९६ लाखांचे वितरण

0

Annasaheb Patil Economic Development Corporation : नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (Annasaheb Patil Economic Development Corporation) योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ हजार ४०२ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली. त्यापैकी ३ हजार २८७ लाभार्थ्यांची प्रकरणे बँकेने (Bank) मंजुरी केली आहेत. या लाभार्थ्यांना २७ कोटी ९६ लक्ष ६६ हजार रुपयांचे कर्ज बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहे. या कर्जापोटी (Loan) लाभार्थ्यांना कर्ज प्रकरणांचा व्याज परतावाही महामंडळामार्फत देण्यात आला आहे, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमोल बोठे यांनी दिली.

नक्की वाचा :मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य  

युवक-युवतींना सक्षम बनविण्यासाठी योजना

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविल्या जातात.

अवश्य वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो

लाभार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन (Annasaheb Patil Economic Development Corporation)

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, प्रशासकीय इमारत, सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.