नगर : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहे. या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. काँग्रेस लोकसभेची तयार करत असतानाच देशभरात भारतीय जनता पार्टी काँग्रेसला मोठे धक्के देत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आज गुजरातमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेस आमदार अर्जुन मोधवाडिया यांच्यासह दोन माजी आमदारांनी सोमवारी (ता.४) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. आज या तिघांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्जुन मोधवाडिया (Arjun Modhwadia) यांचं पक्षातून बाहेर पडणं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो.
नक्की वाचा : श्रीगोंदा लोक अदालतमध्ये चार हजार प्रकरणांचा निपटारा
काँग्रेसचे माजी आमदार अर्जुन मोधवाडिया,अंबरीश डेर व मुलूभाई कंडोरिया भाजपमध्ये (Gujarat Congress)
काँग्रेसचे तीन माजी आमदार अर्जुन मोधवाडिया, अंबरीश डेर आणि मुलू भाई कंडोरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही नेत्यांनी आज (ता.५) दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. मोधवाडिया आणि डेर यांनी काल (ता.४) त्यांच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
अवश्य वाचा : राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज
अर्जुन मोधवाडिया पक्षावर नाराज असल्याची चर्चा (Gujarat Congress)
काही दिवसांत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी गुजरात काँग्रेसच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या पत्रकार परिषदेला अर्जुन मोधवाडिया अनुपस्थित होते. त्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच सायंकाळी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपात प्रवेश केला.
मोधवाडिया म्हणाले, मला काँग्रेसमध्ये गुदमरल्यासारखे होत होतं. मी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर होतो. माझ्यासारख्या व्यक्तीला काँग्रेस सोडण्यासाठी भाग पाडलं जात असेल, तर काँग्रेसने यासंदर्भात विचार करायला हवा.