Fire at Mahakumbh : प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela)मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज या ठिकाणी पुन्हा आग (Fire Accident)लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली.या आगीत १५ टेन्ट (15 tent)जळून खाक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच लाखो रुपयांचं मोठं नुकसान देखील झालं आहे. या आधीही येथे आग लागण्याची घटना घडली आहे.
नक्की वाचा : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी,व्हीव्हीआयपी पास रद्द; उत्तर प्रदेश सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
महाकुंभाच्या सेक्टर २२ मध्ये भीषण आग (Fire at Mahakumbh)
महाकुंभ परिसरातील नागेश्वर पंडालला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे. विशेष बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. पंडालमध्ये उपस्थित सर्व लोक सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.
अवश्य वाचा : “मी काही साधू संत नाही”;बीडमधून अजित पवार यांचा इशारा
महाकुंभाच्या सेक्टर २२ मध्ये ही भीषण आग लागली आहे. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या जाळपोळीत अनेक तंबू जळून खाक झाले.अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर २२ मधील झुशी परिसरातील छतनाग घाटाजवळ असलेल्या नागेश्वर पंडालमध्ये ही आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा लांबच्या अंतरावरुन देखील दिसत होत्या, यावरुन आगीची तीव्रता कळू शकते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.
महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला देखील लागली होती आग (Fire at Mahakumbh)
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला देखील भीषण आग लागल्याची घटना घडली होती. तंबूत असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली होती. या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं. या घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले होते.