Anti-Corruption : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा

Anti-Corruption : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा

0

Anti-Corruption : नगर : राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ (Dakshata Awareness Week) आयोजित करण्यात येतो. यावर्षी २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत भ्रष्टाचारविरोधी (Anti-Corruption) प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

सर्व कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित (Anti-Corruption)

प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची’ प्रतिज्ञा दिली. या प्रसंगी तहसीलदार संजय शिंदे, धर्मादाय विभागाचे उपायुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त विशाल झेंडे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?