Anti Corruption Bureau : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

Anti Corruption Bureau : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

0
Anti-Corruption Division : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई
Anti-Corruption Division : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

Anti Corruption Bureau : नगर : शहरातील नालेगाव परिसरातील जमिनीवर बांधकाम परवानगीसाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर महापालिकेचे (AMC) आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawle) व त्याचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) कारवाई सुरू केली आहे. या दोघांविरोधात जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.

Anti-Corruption Division : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई
Anti-Corruption Division : लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

बांधकाम परवानगीसाठी नऊ लाख ३० हजारांची मागणी

नालेगाव येथे एका बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम करायचे होते. त्यासाठी त्यांनी महापालिकेत बांधकाम परवानगीसाठी १८ मार्च रोजी अर्ज केला होता. या परवानगीसाठी श्रीधर देशपांडेने नऊ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात बांधकाम व्यावसायिकाने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने २० जून रोजी सापळा रचला. पथकाच्या पंचांसमोर देशपांडे याने आयुक्त जावळे याच्याकडून परवानगी मिळवून देण्यासाठी तडजोडी अंती आठ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी श्रीधर देशपांडे व डॉ. पंकज जावळे या दोघांच्या विरोधात आज (गुरुवारी) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

दोन्ही आरोपी पसार (Anti Corruption Bureau)

तत्पूर्वी आज सकाळपासूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक शहरात विविध ठिकाणी कारवाई करत होते. यात महापालिकेतील आयुक्तांचे दालन सील करण्यात आले. तसेच देशपांडेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली तर डॉ. जावळेचे राहते शासकीय घर सील करण्यात आले. या कारवाईतून काही महत्त्वाची कागदपत्रे पथकाने जप्त केल्याचे समजते. दरम्यान, दोन्ही आरोपी पसार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here