Anti-Corruption Bureau : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

Anti-Corruption Bureau : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

0
Anti-Corruption Bureau : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
Anti-Corruption Bureau : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

Anti-Corruption Bureau : नगर : स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद (Ahilyanagar Zilla Parishad) सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता तथा अतिरिक्त पदभार उपअभियंता सचिन सुरेश दिनकर (वय ४१) याला ६ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या : अक्षय कर्डिले

१६ हजार ५०० रुपयांची मागितली लाच

तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून देहरे येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम त्यांनी पूर्ण केले होते. या कामाच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी आरोपी दिनकर यांनी एकूण बिलाच्या २ टक्के प्रमाणे १६ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यापैकी १० हजार रुपये यापूर्वी स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ मार्च रोजी पडताळणी केली असता, उर्वरित ६ हजार ५०० रुपयांची मागणी आरोपीने प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संशय आल्याने दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न (Anti-Corruption Bureau)

सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराने लाच रक्कम देण्याचा प्रयत्न केला असता आरोपीला संशय आल्याने तो दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले. संशय आल्यामुळे आरोपीने प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


दरम्यान, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागितली जात असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नागरिकांनीं तक्रार करावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.