Anti-Corruption Department : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात

Anti-Corruption Department

0
Anti-Corruption Department : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात
Anti-Corruption Department : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात

Anti-Corruption Department : नगर : गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तडजोडीनंतर दीड लाख रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने एका पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

लाच घेतलेल्या संशयितांची नावे

अशोक रामचंद्र गायकवाड, (वय ७१, व्यवसाय शेती , रा.बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्यानगर), राजेंद्र प्रभाकर गर्गे (वय ५७, सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस ठाणे, रा. समर्थनगर सावेडी जि. अहिल्यानगर), असे लाच घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

Anti-Corruption Department : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात
Anti-Corruption Department : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

एक लाख ५० हजारांची लाचेची मागणी (Anti-Corruption Department )

तक्रारदार यांना कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करता साक्षीदार करणेचे मोबदल्यात कोतवाली पोलीस ठाण्याचे राजेंद्र प्रभाकर गर्गे यांचे करिता मध्यस्थी खासगी व्यक्ती अशोक रामचंद्र गायकवाड यांनी बुधवारी (ता. २०) रोजी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती एक लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी केली आहे. या मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाई दरम्यान स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २१) करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम खासगी व्यक्ती अशोक रामचंद्र गायकवाड यांना देणे करिता गेले असता, गायकवाड यांनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारलेली. ही कारवाई नाशिकच्या पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस हवालदार विनोद चौधरी, विनोद पवार, अनिल गांगोडे यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहेत.