
Anti-Corruption Department : नगर : अहिल्यानगर येथे ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच (Bribery) घेताना मोटार वाहन निरीक्षकासह खासगी व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने (Anti-Corruption Department) ताब्यात घेतले आहेत. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) दोघांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ; कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
गीता भास्कर शेजवळ (वय ४४, मोटार वाहन निरीक्षक (वर्ग १) नेमणूक प्रादेशिक कार्यालय अहिल्यानगर), खासगी व्यक्ती इस्माइल पठाण (वय ४३, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : एक कोटीच्या खंडणीसाठी अत्याचाराचा गुन्हा; पोलीस निरीक्षकाची महिलेविरुद्ध फिर्याद
सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले (Anti-Corruption Department)
तक्रारदार यांनी पाटस येथून सिमेंटच्या कंपनीतून आणलेल्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी तीन हजारांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रादार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचासमक्ष अहिल्यानगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सापळा रचून तीन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.