Anupreksha Ji M.S. : अनुप्रेक्षाजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त भक्तिसंध्येचे आयोजन

Anupreksha Ji M.S. : अनुप्रेक्षाजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त भक्तिसंध्येचे आयोजन

0
Anupreksha Ji M.S. : अनुप्रेक्षाजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त भक्तिसंध्येचे आयोजन
Anupreksha Ji M.S. : अनुप्रेक्षाजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त भक्तिसंध्येचे आयोजन

Anupreksha Ji M.S. : नगर : अहिल्यानगरमधील आगरकर मळा, जैन स्थानकात विदर्भ सिंहनी प्रभाकँवरजी म.सा यांच्या शिष्या जिनशासन प्रभाविका अनुप्रेक्षाजी म.सा (Anupreksha Ji M.S.) आदि ठाणा-३ यांचा चातुर्मास सुरू आहे. त्यांच्या सान्निध्यात तपस्या, धर्म आराधणा, धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. महावीर श्रावक संघाने (Mahavir Shravak Sangh) २० वर्षांनंतर चातुर्मास घेतला असल्याने संघामध्ये पूर्ण उत्साह आहे. ५ ऑगस्ट रोजी अनुप्रेक्षाजी म.सा. यांचा ५३ वा जन्म दिवस असल्याने संघ भव्य एकासना दिवस साजरा करणार आहे.

भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Anupreksha Ji M.S.)

या दिवशी सकाळी ८.३० ते १० यावेळी व्याख्यान व संध्याकाळी ८.३० वा. नाटिका व भावना बोरा (कासवा) यांचा भक्ति संध्याचा कार्यक्रम संघाच्या प्रांगणात ठेवण्यात आला आहे. श्रूतीप्रभाजी म.सा., ऋजूप्रभाजी म.सा. यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महावीर श्रावक संघ, आगरकर मळा अध्यक्ष अभय कोठारी, सचिव गादिया सर, ऋषभ गांधी व सर्व कार्यकरणीने केली आहे.