Anuradha Nagawade : श्रीगोंदा : येथील तहसील कार्यालय व श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनी भेट देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयामध्ये रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांसंदर्भात तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी चर्चा करत नाराजी व्यक्त केली. तहसील आणि पोलीस (Police) ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामात सुधारणा करण्याबाबत सूचना करत कामात सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू
कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने नागरिकांचे हेलपाटे
श्रीगोंदा तहसील कार्यालयात शिधापत्रिका, दुबार शिधा पत्रिका, सद्या शाळा सुरु झाल्या असल्याने विद्यार्थ्यांचे दाखले तर राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण या योजने संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ कामासाठी तीन-चार चकरा माराव्या लागत असल्याने प्रशासन यावर काय ठोस उपाययोज करणार? असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
गती देऊन कामे मार्गी लावण्याची मागणी (Anuradha Nagawade)
तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी शिधापत्रिका, दाखले यासाठी कोणाचीही पिळवणू होणार नाही. येत्या आठ दिवसात कामाला गती देऊन कामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. यावेळी टिळक भोस, महिला आघाडी तालुकाध्यक्ष माधुरी नागवडे, सुधीर खेडकर, विशाल सकट, अमोल नागवडे आदी उपस्थित होते.