Anuradha Nagawade : नगर : महाराष्ट्रात वेगळे राजकारण होत आहे. तसेच राजकारण श्रीगोंद्यातही सुरू आहे. शिवाजीराव नागवडे (Shivajirao Nagawade) यांनी श्रीगोंदा तालुक्याला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले. आम्ही त्यांना दोन वेळा पाठिंबा दिला. त्यांनी एकदाही पाठिंबा दिला नाही. साजन पाचपुते (Sajan Pachpute) यांना लहान वयात जे कळाले ते अपक्ष उमेदवाराला कळाले नाही. आपल्याला शेतकऱ्यांचे सरकार आणायचे आहे, असे प्रतिपादन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील (Shrigonda Assembly Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनी काढले आहे.
अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे
अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे सभेचे आयोजन
अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतर्फे श्रीगोंदा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री फौजिया खान, मिलिंद नार्वेकर, सुभान अली, घनःश्याम शेलार, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, विक्रम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना उपनेते साजन पाचपुते आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
अनुराधा नागवडे म्हणाल्या, (Anuradha Nagawade)
महाराष्ट्रासह श्रीगोंदामध्ये देखील वेगळा राजकारण पाहायला मिळत आहे. माझे सासरे शिवाजीबापू नागवडे यांनी श्रीगोंदेतील प्रत्येक माणसाला स्वतःच्या कुटुंबासारखे जपले. मात्र आज जेव्हा नागवडे परिवारावर वेळ आली तर समोरचे कसे वागत आहे. हे तुम्ही पाहत आहे. नागवडे परिवारात जी दानत आहे ती यांच्यात कुणातच नाही. आपण यांना दोन दोन वेळा आमदारकीला मदत केली. मात्र, त्यांना आपल्याला पाठिंबा देता आले नाही, असे म्हणत त्यांनी राहुल जगताप यांना टोला लावला.
घनःश्याम शेलार यांनी आपल्या पाठिंबा दिला. तेच मानसन्मान आम्ही अपक्ष उमेदवार यांचा देखील केला असता. मात्र, त्यांच्यात तेवढी दानत नव्हती. ज्या माणसावर आपण उपकार केले नव्हते पण त्यांच्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून साजन भैय्यांनी उमेदवारी देत मनाचा मोठेपणा दाखवला. श्रीगोंदा तालुक्यात भरपूर निधी आला आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला मात्र तो विकास दिसत नाही. पण या मैदानाच्या शेजारीच पोलीस दलाचा हेडक्वार्टर आहे पहा त्याची काय अवस्था आहे. मग ४० वर्ष तुम्ही हे विकास केला का? तालुक्याचा विकास झाला नाही. ज्या ठिकाणाचा राजा व्यापारी असतो तिथली प्रजा भिकारी करून सोडतो, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.