APMC : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको 

APMC : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको

0
Rasta Roko Movement

APMC : राहुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) समोर राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला देण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांनी स्वतःहून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती.

Rasta Roko Movement

हे देखील वाचा: मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

सहकार मोडीत काढण्याचे सरकारचे धोरण (APMC)

यावेळी स्वाभिमानीचे रवींद्र मोरे म्हणाले, राज्यामध्ये व देशांमध्ये हुकूमशाही गाजवण्याचे काम सध्या सुरू आहे. सहकार मोडीत काढून खासगीकरण करण्याचे सरकारचे धोरण आहे. सहकारी साखर कारखाने विकत घेऊन त्याचे खासगीकरण करायचे, त्याचे स्वतः मालक व्हायचे, अशा पद्धतीने देशात काम सुरू आहे. आता मार्केट कमिटी भविष्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती बरखास्त करण्याचा डाव आहे. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, तो शेतकऱ्यांना मिळून द्यायचा नाही. मार्केट कमिटीचे खासगीकरण करून मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या. तो ठरवेल तोच भाव द्यायचा. या सरकार विरोधात भविषयामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. दूध अनुदानाच्या संदर्भात अनेक किचकट बाबी घातल्या. अशा पद्धतीने काम सुरू आहे.

हे देखील वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना (APMC)

फक्त घोषणा करायची, प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज संतापाची भावना आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, राजू शेटे, बाजार समितीचे संचालक दत्ता कवाणे यांची भाषणे झाली. सतीश पवार, अनंत वने, अभिजीत उंडे, सचिन म्हसे, राम कडू, दीपक रकटे, अक्षय बजाज, युवराज भिंगारदे, सत्यवान आघाव, सतीश पवार, हरिभाऊ वराळे, गोकुळदास गावडे, मधुकर डुकरे, मच्छिंद्र गवळी, स्वप्निल ढगे, प्रमोद वराळे, दत्तात्रय डोंगरे, सुभाष सावज,गणेश माळी, अशोक पुंड, शिवाजी फुलसौंदर, गणेश जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here