App : नगर : क्रेडिट कार्ड (Credit Card) ॲक्टिवेट करण्यासाठी फोन करण्यात आला. फोनवरून कस्टमर सपोर्ट ॲप (App) डाउनलोड करायला सांगण्यात आले. या ॲप्लिकेशनच्या मदतीने एक लाख ९४ हजार ५४६ रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करण्यात आली होती. नगरच्या सायबर पोलिसांनी (Cyber Police) या घटनेचा तपास करत सर्व रक्कम परत मिळवून दिली आहे.
हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान
एक लाख ९४ हजार ५४६ रुपये लंपास
दिल्लीगेट परिसरातील सातभाई गल्ली येथे राहणाऱ्या सागर संभार यांना १९ एप्रिल रोजी एक व्यक्तीचा फोन आला. त्याने इण्डसिंध बँकेच्या क्रेडिट कार्ट विभागातून बोलत असल्याचे सांगत तुमचे क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती द्या व तुम्ही कस्टमअर सपोर्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले. त्यानुसार सागर संभार यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याचे कोड फोन आलेल्या व्यक्तीला सांगितले. त्या आधारे फोन केलेल्या व्यक्तीने संभार यांच्या बँक खात्यावरील एक लाख ९४ हजार ५४६ रुपये लंपास केले. या संदर्भात त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी
तात्काळ कारवाई करून पैसे केले परत (App)
फिर्याद दाखल होताच पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी तात्काळ अर्जदार संभार यांच्याकडून सर्व माहिती घेतली. तसेच तात्काळ संबंधित व्हॉलेट नोडल ऑफीसर यांना ईमेलद्वारे पैसे रिफंड करण्यात यावे, असे कळवण्यात आले. त्यानुसार संबंधित व्हॉलेट कंपनीने पैसे रिफंड केले.