Singham 3 Movie :’सिंघम ३’मधल्या अर्जुन कपूरचा व्हिलन लूक आउट

'सिंघम' चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

0
Singham 3 Movie
Singham 3 Movie

नगर : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) अॅक्शनपट असलेल्या ‘सिंघम’ चित्रपटाच्या (Singham) तिसऱ्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

नक्की वाचा : ‘भूलभुलैया ३’ मध्ये दिसणार विद्या बालन व माधुरी

अर्जुनने शेअर केला लूक (Singham 3 Movie)

अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सिंघम ३’ मधील स्वतःचे दोन फोटो शेअर केले. यातील एका फोटोत रणवीर सिंग दिसत आहे. “सिंघम का खलनायक! असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टला दिले. या फोटोत अर्जुनाचा रक्ताने माखलेला चेहरा दिसत आहे. त्यामुळे त्याच्या लूकची चर्चा रंगली आहे.

अवश्य वाचा : भरत जाधव यांची झी मराठीच्या ‘पारू’ मालिकेत एन्ट्री

सिंघम ३ मध्ये ‘हे’ कलाकार झळकणार (Singham 3 Movie)

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स सिंघम अगेन, फ्रँचायझीमधील पाचवा भाग आणि सिंघम रिटर्न्स (२०१४) सिक्वेलसह परत येणार आहे. ‘सिंघम ३’ या टायटलखाली सप्टेंबर २०१७ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये अधिकृत या शीर्षकाची घोषणा करण्यात आली. ‘सिंघम अगेन’ ऑगस्ट २०२४ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here