Army Dog Tyson:गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी! 

0
Army Dog Tyson:गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी! 
Army Dog Tyson:गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी! 

नगर: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात भारतीय लष्कराचे एक थरारक ऑपरेशन (Indian Army’s thrilling operation)यशस्वी झालं आहे. भारतीय सेनेने यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार (Three terrorists killed) केलं आहे. विशेष बाब म्हणजे या यशाचा मुख्य हिरो ठरला आहे एक चार पायांचा शूर योद्धा आर्मी डॉग टायसन!(Army Dog Tyson) या मोहिमेत सहभागी झालेल्या टायसन नावाच्या एका जर्मन शेफर्ड श्वानाने शत्रूंची गोळी आपल्या अंगावर झेलली आहे.

नक्की वाचा: अजित दादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवा;रोहित पवारांची मागणी  

‘जैश-ए-मोहम्मद’च्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान (Army Dog Tyson)

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात रविवारी (ता.२२) लष्कराच्या ‘व्हाइट नाइट कॉर्न्स’च्या जवानांनी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. यात ‘जैश’चा कमांडर सैफुल्लाह याचा समावेश आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चे दहशतवादी मातीच्या घरात लपले होते. याचा सुगावा लागताच सुरक्षा दलाने गोळीबार केला. यात घराला आग लागली. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह जळालेले होते. या कारवाईत दोन एके-४७ रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या भागात १८ जानेवारीपासून सहा चकमकी झाल्या आहेत.

अवश्य वाचा: लव्ह मॅरेजसाठी लागणार आई-वडिलांची परवानगी? नवा कायदा नेमका काय ?

गोळी झेलणारा ‘टायसन’ ठरला हिरो (Army Dog Tyson)

चकमकीत खरा हिरो ठरला ‘सायलेंट वॉरियर’ म्हणून ओळखला जाणारा ‘टायसन’ नावाचा श्वान. त्याच्यामुळेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे ठिकाण, त्यांच्या हालचाली व अचूक कारवाईची दिशा ठरवण्यास मदत झाली.’टायसन’ दहशतवाद्यांच्या दिशेने आगेकूच करत असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी टायसनच्या पायाला लागली. जखमी अवस्थेतही टायसन मागे हटला नाही. तो पुढे जात राहिला. त्याच्या धाडसामुळे दहशतवादी सापडले आणि सुरक्षा दलांनी निर्णायक कारवाई केली. टायसनला विशेष वैद्यकीय उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्यात आले. त्याला उधमपूरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.आता त्याची प्रकृती सुधारत आहे. नॉर्दर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी या यशाचे कौतुक केले आणि दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.