Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी

Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी

0
Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी
Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी

Arogya Mitra : अहिल्यानगर : महाराष्ट्र (Maharashtra) आरोग्य मित्र कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर काम करत आहेत. वाढत्या महागाईच्या (Inflation) काळात अल्प वेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेतनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्र (Arogya Mitra) कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप

वेतनवाढीसाठी धरणे आंदोलन

आरोग्य मित्र कर्मचारी संघटना ही विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असतात. त्यांना मिळणारे वेतन हे अल्प असून महागाई भत्ता व इतर वेतनवाढीचे लाभ मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. वेतनवाढीसह फरक मिळावा व इतर लाभ मिळावे, या मागणीसाठी ते धरणे आंदोलनास बसले आहेत.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित (Arogya Mitra)

त्यांच्या आंदोलनामुळे रुग्णांना विविध शस्रक्रिया करताना व उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु, आमच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासन त्याकडे लक्ष देत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अल्प वेतनामुळे उपासमारीची वेळ आली असल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी
Arogya Mitra : किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या; महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची मागणी

यावेळी आंदोलकांनी मागण्या केल्या की, आरोग्य मित्रांना दरमहा २६ हजार वेतन द्यावे. किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स व महागाई भत्ता देण्यात यावा. वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी. आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा. शासकीय नियमाप्रमाणे आजारपणाच्या रजा, किरकोळ रजा व सणांच्या सुट्ट्या मिळाव्या. आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. तरी रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने लवकरात-लवकर मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.