Arrest : नगर : तपोवन रोडवरील मोकळ्या जागेत गांजा आणि देशी पिस्तूल (Illegal Weapon) बाळगणाऱ्या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले (Arrest) आहे. त्यांच्याकडून ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
रवींद्र टटिया वारेला (वय २०, रा. वरळीपुरा, सेंदवा, बडवाणी, मध्यप्रदेश), सचिन नानुराम ब्राम्हणे (वय २०, रा. कोटा किराडी, सेंदवा, मध्यप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत सुमित गवळी यांनी फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
गांजा व गावठी कट्टा विक्रीची खात्रीशीर माहिती (Arrest)
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार तपोवन परिसरात गांजा व गावठी कट्टा विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.