Arrested : प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्या महिलेला अटक

Arrested : प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्या महिलेला अटक

0
Arrested : प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्या महिलेला अटक
Arrested : प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्या महिलेला अटक

Arrested : नगर : माळीवाडा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पाकिटे चोरणाऱ्या (Theft) महिलेला कोतवाली पोलिसांनी (Police) आज अटक (Arrested) केली. रंजना भांड्या चव्हाण (वय २७, रा. मरोळा बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

नक्की वाचा: अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी

शहादा सय्यद या त्यांच्या मुलासह माळीवाडा बसस्थानकात करंजी (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी बसमध्ये बसत होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या खिशात ठेवायला दिलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. या संदर्भात शहादा सय्यद यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. 

अवश्य वाचा: मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार

संशयीतरित्या फिरताना ताब्यात (Arrested)

या प्रकरणात तपास करत असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, एक महिला माळीवाडा बसस्थानकात संशयीतरित्या फिरत आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्या झडतीत महिला पोलिसांना सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मिळून आले. तिच्याकडे पथकाने या संदर्भात कसून विचारपूस केली असता तिने एका प्रवाशी मुलाच्या खिशातून हे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने आरोपी महिलेला अटक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here