Arrested : संगमनेर शहरातील रस्त्यांवर जबरी चोरी करणारे चार आरोपी जेरबंद

Arrested : संगमनेर शहरातील रस्त्यांवर जबरी चोरी करणारे चार आरोपी जेरबंद

0
Arrested : संगमनेर शहरातील रस्त्यांवर जबरी चोरी करणारे चार आरोपी जेरबंद
Arrested : संगमनेर शहरातील रस्त्यांवर जबरी चोरी करणारे चार आरोपी जेरबंद

Arrested नगर : संगमनेर शहरात रात्री रस्त्यात अडवून दुचाकी व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने काल (ता. २५) जेरबंद (Arrested) केले. दोन अल्पवयीन आरोपी व फरदीन इसाक शेख (वय २१, रा. भराडवस्ती, अकोले नाका, संगमनेर), अरिफ इसाक शेख (वय २१, रा. भराडवस्ती, अकोले नाका, संगमनेर अशी जेरबंद आरोपींची (Accused Arrested) नावे आहेत.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

भीती दाखवत दुचाकी व मोबाईल नेले होते हिसकावून

कासारवाडी (ता. संगमनेर) येथील आकाश आंबरे हे संगमनेर शहरातून १६ मार्चला रात्री ११.३० वाजता जात होते. त्यावेळी त्यांना चार आरोपींनी अडवून भीती दाखवत दुचाकी व मोबाईल हिसकावून नेले. या संदर्भात त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविला होता.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Arrested)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर व परिसरातील आरोपींबाबत तांत्रिक माहिती मिळवत या माहितीचे विश्लेषण सुरू केले. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा फरदीन शेख व त्याच्या साथीदारांनी केला आहे. फरदीन व त्यांचे साथीदार अकोले नाका येथे आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चोरीचा मोबाईल व दुचाकीबाबत पथकाने फरदीनला विचारले असता त्याने मोबाईल नातेवाईकांना वापरण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या नातेवाईकांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला.