Arrested : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

Arrested : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

0
Arrested : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद
Arrested : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

Arrested : नगर : नारायणडोह (ता. अहिल्यानगर) येथे पंढरीनाथ साठे यांच्या घरावर दरोडा (Robbery) टाकत दोन लाख १७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले होते. तसेच साठे कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणात नगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात (Arrested) घेतले आहे. या आरोपींकडून एक कार व दोन मोबाईल असा तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे. 

नक्की वाचा : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

कटावणीच्या सहाय्याने उघडला दरवाजा

नारायणडोह येथे साठे यांच्या घरावर रविवारी (ता. २२) रात्री २ वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी हल्ला केला. यात घराबाहेर झोपलेल्या पंढरीनाथ साठे यांच्यावर दरोडेखोरांनी प्रथम हल्ला चढवला. त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला. घरातील लोकांना मारहाण केली. तसेच घरातील दोन लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याची फिर्याद प्रतिभा साठे यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

अवश्य वाचा : अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा; रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

तपासासाठी पथके नियुक्त (Arrested)

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या प्रकरणी तपासासाठी पथके नियुक्त केली. या पथकांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केली. पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सोमीनाथ मिनाजी काळे (वय ३०) व त्यांच्या साथीदारांनी हा दरोडा टाकला आहे. ते सोमीनाथ हा त्याच्या साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या कारमधून चांदबिबी महाल परिसरातून जात आहे.

हे वाचा : ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू

सापळा रचून अरोपी ताब्यात

त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी सोमनाथ व त्याचा साथीदार सौरभ सचिन काळे (वय २१, रा. दोघे कौंडगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना जेरबंद केले. तर त्यांचे चार साथीदार चिक्या गोप्या चव्हाण (रा. कौंडगाव तांडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), तुषार नंदू भोसले, आसिफ निमाजी काळे व भगवान इंपिरियल चव्हाण (रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) हे पसार आहेत. जेरबंद आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.