Arun Gawli : नगर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची (Arun Gawli) तुरुंगातून सुटका होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर येतेय. अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिले आहेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी यांच्या सुटकेची मागणी केली होती. तशी याचिका देखील नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत.
हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका
मुदतपूर्व सुटकेची केली होती मागणी (Arun Gawli)
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठी यासाठी अरुण गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्याच्या या मागणीवर न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नक्की वाचा: भारतमातेचा सुपुत्र सुभेदार सुभाष लगड अनंतात विलीन
महाराष्ट्र सरकारचे परिपत्रक काय आहे? (Arun Gawli)
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय ६५ पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल.
गवळीचा जन्म १९५५ चा असल्याने त्याचे वय ६९ वर्ष आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे. म्हणजेच वर्ष २००६ च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो. त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे.