Arun Govil and Dipika Chikhlia: अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया मराठी चित्रपटात झळकणार

‘वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.

0
Arun Govil and Dipika Chikhlia
Arun Govil and Dipika Chikhlia

नगर : दूरदर्शनवर तब्बल ३०-३५ वर्षांपूर्वी प्रसारित झालेली ‘रामायण’ (Ramayan) ही मालिका प्रचंड गाजली. यातील राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. आता या राम-सीतेच्या जोडीची अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे.

नक्की वाचा : देशात १०६ टक्के पाऊस पडणार;महाराष्ट्रालाही दिलासा

राम-सीतेची लोकप्रिय जोडी ‘वीर मुरारबाजी’ मध्ये झळकणार (Arun Govil and Dipika Chikhlia)

‘वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे. पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्य दिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

अवश्य वाचा : मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर येणार चित्रपट

अभिनेता अंकित मोहन दिसणार मुरारबाजी देशपांडे यांच्या भूमिकेत (Arun Govil and Dipika Chikhlia)

Ankit Mohan

आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा, यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटा विषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध करणार आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here