Arun Jagtap:माणसे जोडणारा नेता हरपला! जाणून घ्या,माजी आमदार अरुण जगतापांचा राजकीय प्रवास…

0
Arun Jagtap:माणसे जोडणारा नेता हरपला! जाणून घ्या,माजी आमदार अरुण जगतापांचा राजकीय प्रवास...
Arun Jagtap:माणसे जोडणारा नेता हरपला! जाणून घ्या,माजी आमदार अरुण जगतापांचा राजकीय प्रवास...

Arun Jagtap : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांचे वडील तसेच माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (Arunkaka Jagtap) यांचे आज (ता.२) पुण्यात निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने ५ एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल महिनाभर त्यांनी मृत्यूशी (Death) झुंज दिली. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध स्तरातून प्रार्थना केली जात होती. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर (sarasnagar) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा : मनोज जरांगेंची मोठी घोषणा;’या’ दिवशी करणार पुन्हा उपोषण  

नगराध्यक्ष ते आमदार असा होता प्रवास…(Arun Jagtap)

अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली.अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते. तसेच सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार, तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.अरुणकाका जगताप यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं होत. मात्र नगर शहर मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवला सामोरे जावे लागले. पराभवाने खचून न जाता त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच संग्राम जगताप यांना महापौरपदावर विराजमान केलं आणि आपली राजकीय वारसा पुढे नेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या राजकारणाला दिशा दिली. काही काळासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी सहा महिन्यांतच त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परत येऊन आपली निष्ठा सिद्ध केली.

अवश्य वाचा : समंथासाठी काय पण!चाहत्याने वाढदिवशी चक्क मंदिर उभारलं!

राजकारणाबरोबरच क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील ठसा (Arun Jagtap)

अरुण काका हे केवळ राजकारणी नव्हते,तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे, गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडली.

काकांच्या इतर आवडी निवडी

एक अभ्यासू व संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या अरुण काका यांची राजकारणाबाहेर देखील एक वेगळीच छाप आहे. काकांना घोडेस्वारीची विशेष आवड होती. शेती, उद्योग, आणि हॉटेल व्यवसायात त्यांची खास रुची होती, ज्यामुळे ते केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांशीही घट्ट नातं निर्माण करू शकले.

मुलांना दिला राजकीय वारसा

माजी आमदार राहिलेले अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीन वेळा नगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या सूनबाई शितल संग्राम जगताप या नगरसेविका, तर काकांचे दुसरे सुपुत्र सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तर सचिन यांच्या अर्धांगिनी सुवर्णा सचिन जगताप जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. अरुण काका यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.