Arun Tanpure : राहुरी : चार कोटी रुपये खर्चून लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात (Ramdas Patil Dhumal College) एमसीएस व एमसीए अभ्यासक्रमासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारली जाणार असल्याचे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना (Dr. Tanpure Cooperative Sugar Factory) अध्यक्ष अरुण तनपुरे (Arun Tanpure) यांनी सांगितले. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय राहुरी या ठिकाणी शिवजयंती महोत्सव आणि युवा महोत्सव समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी कारखाना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
नक्की वाचा : राहाता न्यायालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा
नवीन कोर्सेस सुरु करणार
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, महाविद्यालयात नवीन विविध कोर्सेस येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सुरु करणार आहोत. एम सी एस हा व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करु. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयटीमध्ये चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेणार आहोत. महाविद्यालयातील शिक्षण हे संस्कार घडवत असतात विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आयुष्य हे शिक्षणावर अवलंबून असतात .आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये धकाधकीच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य मिळवण्यासाठी त्यांना खेळासाठी चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देवू.
अवश्य वाचा : उपमुख्यमंत्री सनेत्रा पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने महाविद्यालयाला धनादेश (Arun Tanpure)
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे केला. या कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वेताळ यांनी केला. महाविद्यालयाचे सहाय्यक ग्रंथपाल जगन्नाथ इंगळे यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्याकडे महाविद्यालयाला धनादेश दिला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.



