Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक

Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक

0
Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक
Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक

Arunkaka Jagtap : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे माजी आमदार दिवंगत अरुणकाका जगताप (Arunkaka Jagtap) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (बुधवारी) शोकसभेचे यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर क्षेत्रातील व्यक्तींनी या शोकसभेला उपस्थिती लावली होती. यावेळी स्व. अरुणकाकांच्या स्मृती जाग्या करत भावना व्यक्त करताना उपस्थित सर्वचजण भावूक होत होते. अरुणकाकांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पालकत्व गमावले असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आलेली अरुणकाकांच्या जीवनावरील ध्वनी चित्रफित पाहून उपस्थित सर्वजण भावूक झाले. यावेळी उपस्थित असलेले आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप (Sachin Jagtap) यांची उपस्थित सर्वांनी भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

सर्व क्षेत्रांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित

या शोकसभेला आदिनाथशास्त्री महाराज, बद्रीनाथ तनपुरे महाराज, मंदारबुवा रामदासी, रमाकांत व्यास महाराज, पुंडलिकशास्त्री जंगले महाराज, उद्धव मंडलिक महाराज, आलोकऋषीजी महाराज, रामदास क्षीरसागर महाराज, मास्टर दीपक पाडळे, महानुभाव पंथाचे शाम बिडकर महाराज आदी आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मगुरूंच्या उपस्थितीत (कै.)अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामूहिक शब्दांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व क्षेत्रांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक
Arunkaka Jagtap : अरुणकाका जगतापांना श्रद्धांजली वाहताना सार्वजण झाले भावूक

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

यावेळी बद्रीनाथ तनपुरे महाराज म्हणाले, (Arunkaka Jagtap)

जगावे तर काकांसारखे मारावे तर काकांसारखेच असे आदर्श जीवन अरुणकाका जगले. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या प्रत्येकासाठी जगताप परिवार आधार असे.

पुंडलिकशास्त्री जंगले महाराज म्हणाले, वारकरी संप्रदाय जपत कायम दिद्यांना सहकार्य करण्याचा वारसा अरुणकाकांनी पुढे चालवला. आता त्यांच्यानंतर दोन्ही मुलेही हा वारसा पुढे नेतील.

मंदारबुवा रामदासी म्हणाले, अरुणकाकांनी आपले पूर्ण जीवन लोकहितासाठी वेचले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्येंचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आ.संग्राम जगताप व सचिन जगताप यांना सर्वांनी सहकार्य करावे.

अलोकऋषीजी म्हणाले, अरुणकाकांनी समज जोडण्याचे मोठे काम करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या या चांगल्या कामच अनुकरण सर्वांनी करावे. संग्राम जगताप व सचिन जगताप त्यांच्या पायावर पाऊल टाकून समाजकार्य करत आहेत.

मास्टर दीपक पाडळे म्हणाले, अरुणकाकांनी शहरातील ख्रिस्ती समाजचे अनेक प्रश्न मार्गी लावले. दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देत त्यांनी मोठे सहकार्य समाजाला केले होते.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, २०१२ साली मी जिल्हा परिषदेची सदस्य झाले तेव्हापासून काकांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. तसेच मतदारसंघासाठी मोठा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, अरुणकाका बालपणी वाडियापार्क येथील संघाच्या शाखेत नित्याने येत असे. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसमर्पित जीवन जगले. तसेच गोसेवा केली.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, सध्याचे राजकारणात द्वेष वाढत आहेत. पण अरुणकाकांनी कधीही द्वेषाने राजकारण केले नाही. तर विरोधाकांन्ही आपले करून घेतले. त्यांच्या स्मरणार्थ येत्या वर्षात ६६ हजार झाडे लावून संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन केले.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अरुण काकांनी सर्व क्षेत्राला राजश्रय देत मोठे सहकार्य केले. आज त्यांच्या निधनाने हे सर्व क्षेत्रे पोरके झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दादा कळमकर म्हणाले, मी व अरुणकाका अनेक निवडणुका विरोधात लढलो पण कधीही आमच्यात कटुता आली नाही. त्यांना आमदार होण्यासाठी मी मदत केली तर अभिषेकला महापौर होण्यासाठी काकांनी मला मदत केली होती. त्यांच्यावर जनता केव्हढे प्रेम करत होते ते विराट अंत्ययात्रेने सर्वाना दिसले आहे.

आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, काकांनी सर्वांवर प्रेम केले व सर्वांनीच काकांवर प्रेम केली आहे. या प्रेमापोटीच आज येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला जमला आहे.

माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, अरुणकाकांचे कार्य एका शोक सभेमध्ये व्यक्त होणे अशक्यच आहे. प्रत्येकाला भावना व्यक्त करायच्या आहेत. यासाठी लवकरच काकांच्या जीवनावर एक परिपूर्ण पुस्तक करण्याच्या कामास सुरुवात करणार आहोत. काकांच्या वर्षश्रद्धा पर्यंत हे पुस्तक आपण सर्व मिळून तयार करू, असे सांगून उपस्थित सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

यावेळी प्रताप ढाकणे, विनायक देशमुख, बापूसाहेब कांडेकर, आरपीआयचे सुनील साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, माजी आमदार विठ्ठलराव अभंग, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, माधवराव कानवडे, संभाजी कदम, सुमित गायकवाड आदींनी थोडक्यात भावना व्यक्त करून अरुण काकांना श्रद्धांजली वाहिली. प्रा प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.