Arvind Kejriwal : “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही” आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करणे : अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal : “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही" आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करणे : अरविंद केजरीवाल

0
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : नगर : नुकत्याच एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सध्याच्या राजकीय (Political) परिस्थितीवर भाष्य केलं. आप आणि काँग्रेसची (Congress) कायमस्वरूपी आघाडी नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल

ज्या काँग्रेसला हरवून केजरीवाल दिल्लीत विजयी झाले, त्याच काँग्रेससोबत ते इंडिया आघाडीत दाखल झाले. मात्र, आता काँग्रेसशी घरोबा कायमचा नाही असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून जामिनावर बाहेर आहेत. २ जूनपर्यंत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना तुरुंगात जावं लागेल. मात्र, यादरम्यान प्रचारसभा व मुलाखतींमधून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर व भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी

मोदींचा पराभवासाठी इंडिया आघाडीत सहभागी (Arvind Kejriwal)

भाजप विरोधकांच्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्ष सहभागी आहे. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसशी सलोखा केल्याची टीका होऊ लागली. मात्र, तरीही केजरीवाल यांनी मोदींचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं जाहीर केलं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसनं निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेतल्या. पण आता केजरीवाल यांनी केलेल्या विधानाची चर्चा होऊ लागली आहे.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

केजरीवाल म्हणाले की,
“आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे. सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आघाडी आवश्यक होती, तिथे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आली आणि दोघांचा मिळून एक उमेदवार उभा केला. पंजाबमध्ये भाजपाचं अस्तित्वच नाहीये. म्हणून पंजाबमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here