Arvind Kejriwal | नगर : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार
घरी तपास (Arvind Kejriwal)
आज सायंकाळी ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली.
हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल
मद्य घोटाळा (Arvind Kejriwal)
अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात नऊवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर आज सायंकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.