Arvind Kejriwal: अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर!

ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

0
Arvind Kejriwal: अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर!
Arvind Kejriwal: अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर!

नगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर आज (ता.१२) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचं प्रकरण ईडीनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे.

नक्की वाचा : आमदार रोहित पवार यांचे उपोषण मागे

तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार (Arvind Kejriwal)

आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, पण त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत तो सध्या तुरुंगातच राहणार आहे.

अवश्य वाचा : निवृत्तीनाथ महाराज पालखी रथावर भंडाऱ्याची उधळण

अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, सीबीआय प्रकरणी १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल. मात्र, केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची प्रबळ शक्यता आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक (Arvind Kejriwal)

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना कनिष्ठ न्यायालयाने २०जून रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा युक्तिवाद ईडीने केला होता. त्यानंतर केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here