नगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने (ED) कारवाई करत अटक केली आहे. कोर्टाने केजरीवालांना ईडी कोठडी सुनावली आहे. त्यातच आता केजरीवाल यांची तब्बेत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या कोठडीत असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल (Sugar Low) लो झाली आहे.
नक्की वाचा : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आज आमने सामने
अरविंद केजरीवाल याच्यावर करावी जरी झाली असेल तरी जेलमधूनच ते सरकारचं कामकाज बघत आहेत. मागच्या काही तासांपासून केजरीवाल यांची शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. त्यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंदेतून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण
केजरीवाल यांनी कोठडीतून दिले आदेश (Arvind Kejriwal)
कोठडीत असतानाही दिल्लीच्या काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर तोडगा काढावा,असे आदेश केजरीवाल यांनी पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांना दिलेत. यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करत केजरीवाल यांना अटक झाली असली तरी दिल्लीकरांचे कोणतेही काम अडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांचे हित लक्षात घेऊन आदेश दिला. हा आदेश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, असेही त्या म्हणाल्या होत्या.