नगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi Highcourt) मोठा दिलासा दिला आहे. कारण केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नक्की वाचा : राज्यात उष्णतेची लाट; मात्र ‘या’ दिवसापासून पावसाचा अंदाज
न्यायालयाकडुन अरविंद केजरीवाल यांना १४ दिवसांची कोठडी (Arvind Kejriwal)
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. अशातच दिल्ली उच्च न्यायालयात केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. न्यायालयाने या याचिकेवर विचार करण्यास देखील नकार दिला. या याचिकेवर न्यायालयात युक्तिवाद चालू असताना न्यायमूर्ती म्हणाले, कधीकधी वैयक्तिक हित राष्ट्रीय हिताच्या अधीन असलं पाहिजे.
अवश्य वाचा : भाजपला धक्का; खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत
‘मुख्यमंत्रीपदावर राहायचा निर्णय केजरीवाल यांचा असेल’ (Arvind Kejriwal)
हिंदू सेना संघटनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र कार्यवाहक न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंह अरोरा यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की, मुख्यमंत्रीपदावर राहायचं आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय केजरीवाल यांचा असेल. न्यायमूर्ती म्हणाले, काही वेळा वैयक्तिक हिताला राष्ट्रहिताच्या आधीन राहावं लागतं. परंतु,हा केजरीवाल यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही याप्रकरणी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिल्लीचे उपराज्यपाल किंवा भारताचे राष्ट्रपती याबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर याचिकाकर्ते विष्णू गुप्ता म्हणाले, मी माझी याचिका मागे घेत आहे.