Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; ‘असा’ असणार अंत्ययात्रेचा मार्ग

0
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; 'असा' असणार अंत्ययात्रेचा मार्ग
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; 'असा' असणार अंत्ययात्रेचा मार्ग

नगर : दैवी सुरांचं देणं लाभलेल्या सूरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle Funeral) यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन (Demise) झाले. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील त्यांचे चाहते शोकाकुल झाले आहेत. आज शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर आणि चाहत्यांची गर्दी (Crowd gathers to pay last respects) उसळली आहे.

नक्की वाचा: रुपाली चाकणकरांची बहीण शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, खरात विषयी काय बोलणार?

आशा भोसले यांच काल(ता.१२) निधन झाल्यानंतर, आज अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव कॅसा ग्रॅंडे येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. राज ठाकरे तसेच इतर अनेक महत्वाचे नेतेही काल अंत्यदर्शनासाठी आले होते. तर आज बॉलिवूड क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार यांच्यासह आशा भोसले यांचे असंख चाहते, मान्यवर व्यक्ती त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत.

आज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अंत्यदर्शनाची वेळ ठेवण्यात आली असून त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची रीघ लागलेली पहायला मिळत आहे. दुपारी ३. ३० वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून, शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने आशा भोसले शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाणार असून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही फसवलं;परिवहन अधिकाऱ्यांच्या नावेही फसवणूक

अंत्यविधीसाठी तयारी कशी? (Asha Bhosle Funeral)

मुंबई महानगर पालिकेकडून आशाताईंच्या अंत्यविधीची तयारी झाली आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक अतिमहत्वाचे लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीच्या आजूबाजूला एलईडी स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या स्क्रीनवर आशाताईंचे गाणी लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. १० ते १२ हजार लोक अंत्यदर्शनाला येतील, असा महानगर पालिकेचा अंदाज असून त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत आल्यानंतर थोडा वेळ अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार आहे. स्मशान भूमीत अनेक मंत्री आणि नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग (Asha Bhosle Funeral)

कासा ग्रँड एक्झिट गेट- डावे वळण- पेनिन्सुला सिग्नल -उजवे वळण -गणपतराव कदम मार्ग -श्रीराम नाका -वरळी नाका- उजवे वळण डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग -पोद्दार जंक्शन- ग्लॅस्को जंक्शन-सास्मिरा जंक्शन- हार्डीकर जंक्शन -सेंचुरी जंक्शन- किस्मत जंक्शन- हत्तीचा पुतळा -सिद्धिविनायक मंदिर- काशिनाथ धुरू- कीर्ती कॉलेज- सूर्यवंशी हॉल- डावी वळण-स्मशान भूमी.