
नगर : ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले आज अनंतात विलीन (Asha Bhosle Passes Away) झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral Rites) करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांसह राजकीय, सामाजिक, सिनेजगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांच्या रुपात त्या कायम आपल्यातच राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नक्की वाचा: आयपीलच्या मैदानात हैदराबादसमोर आज राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना राजस्थान जिंकणार?
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Asha Bhosle Passes Away)
आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. हे वृत्त समोर येताच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाताईंच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला आणि अनेक दशके रसिकहृदयावर अधिराज्य गाजवणारा हा ‘दैवी स्वर’ पंचतत्त्वात विलीन झाला. त्यांचे भारतीय कलेतील योगदान अतुलनीय असल्याने, राज्य सरकारतर्फे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत फैरी झाडून आणि शोकधून वाजवून या महान गायिकेला मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अवश्य वाचा: MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल ;५३ ऐवजी १५३ संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार
आशा भोसले यांची कारकीर्द (Asha Bhosle Passes Away)
आशा भोसले यांना अलौकिक स्वरांची देणगी लाभली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांत त्यांनी गाणी गायली. त्यांनी मागील वर्षी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. वयाची नव्वदी पार करूनही खणखणीत आणि मधूर आवाजाने त्यांनी अनेक कार्यक्रमांत गाणी गायली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला साथ न दिल्याने आशाताईंचे निधन झाले.


