Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

0
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi : कर्जत: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त कर्जतचे (Karjat) ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज (Sadguru Godad Maharaj) मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाने आणि हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला. यावेळी मंदिरात आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की वाचा: महारक्तदान शिबिराची दखल देशपातळीवर घेतली जात आहे : संग्राम जगताप

मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

धाकटी पंढरी कर्जत येथे आषाढी एकादशी निमित्त संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत ज्ञानोबा, माऊली, तुकाराम यासह हरिनामाचा गजर आणि संत सदगुरु गोदड महाराज की जय या गजराने भाविकांनी मंदिर दणाणून सोडले होते. गोदड महाराज हे थोर संत होवून गेले असून एक जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे. त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी घेतली आहे.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त संत गोदड महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी

अवश्य वाचा: नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग

एकादशीनिम्मित मंदिरात आकर्षक सजावट (Ashadhi Ekadashi)

आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी दोन्ही बाजूस रांगा लावल्या होत्या. एकादशीनिम्मित मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शन सुलभ व्हावे यासाठी गोदड महाराज मंदिर समितीच्यावतीने बॅरेकेटींग लावण्यात आले होते. सायंकाळी संत सदगुरु गोदड महाराजांची दिंडी टाळ-मृदगाच्या गजरात हरिनामाचा गजर करीत कर्जत नगरीच्या प्रदक्षिणेसाठी रवाना झाली होती. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here