Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

0
Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा
Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

Ashadhi Ekadashi : सोनी मराठी वाहिनीच्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar) या लोकप्रिय रिअॅलिटी शोने (Reality Show) अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. आपल्या भारावून टाकणाऱ्या कीर्तनाने या सगळ्या कीर्तनकारांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं. यात सहभागी सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तन सादरीकरणाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तमोत्तम कीर्तनकारांमधून सहा सर्वोत्तम कीर्तनकार स्पर्धकांनी आता अंतिम फेरी (Final Round) गाठली आहे.

नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत   

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार कार्यक्रमाचा अंतिम सोहळा (Ashadhi Ekadashi)

कीर्तनातून संतवाणी ऐकण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने वारक-यांना मिळते. यंदा हीच संधी प्रेक्षकांना घरबसल्या सोनी मराठी वाहिनीमुळे मिळणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा अंतिम सोहळा येत्या ६ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार आहे.सहा स्पर्धकांमध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण विजेत्याला मिळणार ट्रॉफी (Ashadhi Ekadashi)

अप्रतिम कीर्तन सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या पहिले कीर्तन रत्न -सोमनाथ महाराज पाटील, दुसरे कीर्तन रत्न – प्रमोद महाराज डुकरे, तिसरे कीर्तन रत्न – हर्षद महाराज भागवत, चौथे कीर्तन रत्न- सोमनाथ महाराज बदाले, पाचवे कीर्तन रत्न- कल्याणी महाराज मोरे, सहावे कीर्तन रत्न- लक्ष्मण महाराज लटपटे या सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे.