Ashadhi Wari 2024:आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये (Pandharpur) भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही दिवसांतच पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुललेली दिसेल. अनेक गावांतून टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आहे.

0
Ashadhi Wari 2024:आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित
Ashadhi Wari 2024:आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

नगर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये (Pandharpur) भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही दिवसांतच पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुललेली दिसेल. अनेक गावांतून टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आहे. आज (ता.२८) जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे. या धर्तीवर  प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पंढरपूरमध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या ६५ एकरावरील भक्तिसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नक्की वाचा : दणदणीत विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री;इंग्लडला लोळवले

६५ एकर जागेत वारकऱ्यांची सोय (Ashadhi Wari 2024)

काही वर्षांपूर्वी प्रशासनाने चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या ६५ एकर जागेत भक्तिसागर हा वारकऱ्यांच्या मोफत निवासासाठी तळ विकसित केलाय. या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी, डांबरी रस्ते, वीज , स्वच्छतागृहे, दवाखाने, पोलीस व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा पुरविल्याने हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवास तळ तयार झाला आहे. याठिकाणी ४९७ मोकळे प्लॉट तयार केले असून या ठिकाणी भाविक आणि दिंड्या आपले तंबू आणि राहुट्या टाकून निवास करत असतात. आता आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत असून उद्या माऊली पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. याशिवाय राज्यातल्या अनेक भागातून विविध संतांचे पालखी सोहळे  पंढरपूरकडे वाट चालत आहेत.

अवश्य वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

प्लॉटचे आगाऊ आरक्षण करण्याचे प्रशासनाचे आवाहन (Ashadhi Wari 2024)

आषाढी यात्रा काळात शहरात जवळपास १८ ते २० लाख भाविक येत असताना नेहमीच निवासाचा प्रश्न उभा राहत असतो. अशावेळी पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि भाविकांनी या ६५ एकर जागेवर आपल्या प्लॉटचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्याचे अर्ज आधी येतील त्यांना जागा दिली जाणार असल्याने तातडीने अर्ज देऊन गैरसोय टाळण्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले. यावर्षी याच ठिकाणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौथे महाआरोग्य शिबीर घेतले जाणार असून त्यामुळे येथे राहणाऱ्या चार ते पाच लाख भाविकांना जागेवर सर्व प्रकारचे उपचार मिळू शकणार आहेत. या शासनाच्या ६५ एकर शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या १६ एकर जागेतही भाविकांच्या निवासाची सोय केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here