Ashish Yerekar : नगर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी ७ जून २०२५ पर्यंत क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे (एफ.टी.के) पाणी गुणवत्ता तपासणी (Water Testing) व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व १ हजार ५७५ गावांत ही मोहीम राबवून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी (Drinking Water) उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Ashish Yerekar) यांनी केले आहे.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेची सुरवात
जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, सुभाष सातपुते, दादाभाऊ गुंजाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे तसेच सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावपातळीवर एफ.टी.के. संचाद्वारे रासायनिक व जैविक तपासणीसह जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यांतील पाण्याचे नमुने तपासले जातील. संबंधित माहिती ‘डब्ल्यूक्यूएमआयएस’ पोर्टलवर नोंदविली जाणार आहे.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
जैविक प्रदूषणाची तात्काळ तपासणी (Ashish Yerekar)
एफ. टी. के. हा एक पोर्टेबल तपासणी संच असून या किटद्वारे पिण्याच्या पाण्यातील पीएचस्तर, क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कॉलिनिटी, गढूळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणाची तात्काळ तपासणी करता येते. यामुळे गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखता येते व आवश्यक उपाययोजना शक्य होणार आहे.