Ashok Chavan : काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावं : खासदार चव्हाण

Ashok Chavan : काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावं : खासदार चव्हाण

0
Ashok Chavan : काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावं : खासदार चव्हाण
Ashok Chavan : काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावं : खासदार चव्हाण

Ashok Chavan : राहाता: काँग्रेस (Congress) पक्षाने आत्मपरीक्षण करावं, एवढी दयनीय परिस्थीती का झाली? मी राज्याचा प्रमुख असताना ८२ जागा निवडून आल्या, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आले आणि ८२ च्या ४२ केल्या, आणि आता काँग्रेसचे नाना पटोलेंनी ४२ वरून १६ वर आणलायं हा इतिहास असून झालेल्या परिस्थितीचे आकलन त्यांनी करायला हवं. मी काही सल्ला द्यायला बसलेलो नाही. मोठी जानकार माणसे तेथे आहेत, असा टोमणा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे (BJP) खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मारला.

नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

सहपरिवार साई दरबारी हजेरी

राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत शुक्रवारी (ता.२९) माध्यान आरतीपूर्वी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावली. यावेळी मुलगी नवनिर्वाचित आमदार श्रीजया आणि संपूर्ण परिवारासह साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात तसेच जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांच्या हस्ते चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. साई दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही शुभकार्यांची सुरूवात मी साईंच्या दर्शनाने करत आलोय. गेल्या ५० वर्षापासून माझे आई – वडील आणि पुर्ण कुटुंब साईंच्या दर्शनासाठी येतात. साईबाबा आमच्या कुटूंबाचे गुरू आहेत. बाबांचा आशिर्वाद घेऊन कामाची सुरूवात करायची, ही आमची प्रथा आणि परंपरा राहिली आहे.

अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी

मुख्यमंत्री पदासाठी तिनही पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय (Ashok Chavan)

निवडणुका झाल्या, माझी कन्या श्रीजया विधानसभेत चांगल्या मताधिक्याने निवडून आली. हे बाबामुळे शक्य झाल्याने बाबांच्या चरणी नतमस्तक आणि आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. मुख्यमंत्री पदासाठी काय अडचण आहे, याविषयी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ठरण्यात काही अडचणी नाही. मी त्या प्रकियेत नाही. मात्र, तिनही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा आणि समन्वय झाला आहे. बराचसा विषय मार्गी लागलाय फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी १४ वर्ष वनवास भोगला. त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला वैयक्तिक आकस नाही. मी बाबांचा भक्त असल्याने विनाकारण कोणावर टीका करावी, हा माझा हेतू नाही. रागाच्या भरात मी काही बोललो असेल, त्याच त्यांनी मनावर घेऊ नये. राजकारणात हार – जीत होत राहते. प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here