Ashok Kharat : अकोले : कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदूबाबाने नाशिक येथे राज्यभरातील हजारो लोकांची आर्थिक व शारीरिक लूट केली आहे, मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता त्यात अनेक मोठे प्रभावशाली राजकीय नेते (Political Leader) गुंतलेले दिसते आहे. अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (Communist Party of India (Marxist)) करण्यात आली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व
खरातशी संबंधित मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी
कुणीही भोंदूबाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करू शकत नाही. त्यामागे राज्यातील सत्ताधारी, राजकीय नेते आणि प्रशासनातील काही घटक यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्य समोर यावे यासाठी, या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी करण्यात यावी. अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी. या प्रकरणात कोणताही राजकीय नेता, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती सहभागी आढळल्यास त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारू (Ashok Kharat)
पीडित नागरिकांना तत्काळ न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी. राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अशाप्रकारच्या घटनांना कायमचा आळा घालावा. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, मग तो कितीही मोठा राजकारणी, अधिकारी किंवा सत्ताधारी घटक असो, या तत्वानुसार जे जे या भोंदूगिरीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ देत होते त्या सर्वांवर कारवाई करावी. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. असे झाल्यास माकप या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.



