
Ashok Kharat : नगर : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याचे नवनवीन कारनामे उघड होत असून, ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे त्याचे भक्त असलेले मोठे व्यावसायिक व उद्योजकांकडे तो स्वत:च बनावट प्राप्तीकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली मोठी रक्कम (Amount) उकळत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस (Police) आधिकाऱ्यांनी दिली.
नक्की वाचा : सेनापती बापट मल्टीस्टेटचा कर्जदार अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
फसवणुकीचा नवा फंडा
खरातशी संबंधित शिर्डी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण तसेच समता पतसंस्थेतील बनावट खाती उघडून त्यातून केलेल्या बेनामी प्रकरणाचा तपास सध्या अहिल्यानगर पोलीस करत आहेत. या तपासातून अनेक गोष्टी नव्याने समोर येत आहेत. या तपासातून खरात याचा फसवणुकीचा हा नवा प्रकार समोर आला आहे. खरात हा ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे त्याचेच भक्त असलेल्या अनेक व्यावसायिक व उद्योजकांवर बनावट प्राप्तीकर अधिकाऱ्यांमार्फत छापे घालत असे. यावेळी तडजोडीच्या नावाखाली तो मध्यस्थी करून मोठी रक्कम उकळत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
हेही पहा : करंजी घाटात ट्रक उलटला; लोखंडी पाइप रस्त्यावर पडल्याने मार्ग बंद
‘त्या’ प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? (Ashok Kharat)
दरम्यान, शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचारी असलेला विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात खरात याचे नाव होते. परंतु, तपासामध्ये त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे न आढळल्याने त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी मृत दिवटे याच्या भावाने केली आहे. याबाबत त्याने शिर्डी पोलीस ठाण्यात आज अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे आता भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक नवनवीन कारनामे समोर येत असल्याचे दिसून येत आहे.


