Ashram Schools : जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ!

Ashram Schools : जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ!

0
Ashram Schools : जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ!
Ashram Schools : जिल्ह्यातील ४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा लाभ!

Ashram Schools : नगर : राज्य शासनाच्या (State Government) विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘आश्रमशाळा योजना’ (Ashram Schools) ही जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाची प्रभावी पायरी ठरत आहे. सध्या या योजनेअंतर्गत ४ हजार ७०३ विद्यार्थी निवासी शिक्षणाचा (Education) लाभ घेत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देत ही योजना त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ‘ज्ञानदीप’ ठरली आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्ह्यात सध्या २६ आश्रमशाळा कार्यरत

विमुक्त व भटक्या जमातीतील मुला-मुलींना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास साधावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या २६ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी ७ प्राथमिक, १६ माध्यमिक आणि ३ उच्च माध्यमिक आश्रमशाळांचा समावेश आहे.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सर्व मूलभूत गरजा शासनामार्फत मोफत उपलब्ध (Ashram Schools)

विद्यार्थ्यांना निवास, भोजन, वस्त्र, शिक्षणसाहित्य, वैद्यकीय सुविधा अशा सर्व मूलभूत गरजा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. आश्रमशाळा चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दरमहा दरडोई निवासी विद्यार्थ्यांप्रमाणे २ हजर १०० रुपये इतके परिपोषण अनुदान देण्यात येते. तसेच मान्य निवासी कर्मचाऱ्यांवर ८ टक्के व १२ टक्के वेतनेतर अनुदान आणि इमारत भाडे देण्यात येते.


विजाभज आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने ‘निपुण भारत’ योजनेंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आश्रमशाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांबरोबरच अनिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.


एकूणच, सामाजिक न्याय व समान संधीचे प्रतीक ठरलेली ‘आश्रमशाळा योजना’ आज जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवित आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना म्हणजे शिक्षणाच्या दिशेने झेप घेण्याचा आशेचा किरण ठरली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेमुळे आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव व्यक्त केले आहेत. “आमच्या गावात माध्यमिक शाळा नव्हती, पण आश्रमशाळेत दाखल झाल्यानंतर मला चांगले शिक्षण, भोजन आणि सुरक्षित राहणी मिळाली. शासनाच्या या उपक्रमामुळे आज मी उच्च शिक्षण घेत आहे,” अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.