Ashwini Thorat : नगर : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी विशेष भर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा विकास होणे शक्य नाही, अशी धारणा डाॅ. विखे यांची आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मिती केली. बचत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनविले. २०० हून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले. अनेक महिलांना पीठ गिरणी, वजन काटा, पॅकिंग मशिनच्या साहाय्याने त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून आपल्या पायावर उभे केले, असे प्रतिपादन भाजपच्या (BJP) महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात (Ashwini Thorat) यांनी केले.
अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू
अश्विनी थोरात म्हणाल्या (Ashwini Thorat)
”सुजय विखे पाटील यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून १६. ८१ कोटी रुपये खर्च करून १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय उभे केले. अधिकमास महिन्यात महिलांना तीर्थस्थळी जाण्यासाठी देव दर्शन यात्रेचे आयोजन केले. धार्मिक कार्याला हातभार लावला. यामुळे महिलांच्या मनात नेता कसा असावा? याचा आदर्श सुजय विखेंनी निर्माण केला आहे.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप
महिलांना विविध योजनांमधून लाभ
त्याच बरोबर महिलांसाठी असणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या. महिलांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील ३ लाख १० हजार १४५ महिलांना या योजनेचा लाभ देत त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावले. तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या १ लाख ५३ हजार ९१९ मातांना ६२ कोटी २३ लाखाचा निधी मिळवून दिला.”