Asian Powerlifting Championships : अहिल्यानगरच्या अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!; आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले

Asian Powerlifting Championships : अहिल्यानगरच्या अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!; आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले

0

Asian Powerlifting Championships : नगर : अहिल्यानगर शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा (Anuradha Ratnesh Mishra) यांनी भूतान (Bhutan) येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (Asian Powerlifting Championships) भारताचे प्रतिनिधित्व करत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. महिलांच्या विभागात त्यांनी ३५० किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी करत दोन सुवर्ण पदके पटकावली.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

विविध देशांमधील नामांकित खेळाडू सहभागी

संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशनच्या (इंडू श्री ऑर्गनायझेशन) वतीने या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भूतानची राजधानी थिंपू येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशांमधील नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात अनुराधा मिश्रा यांनी दाखवलेले दमदार प्रदर्शन भारतीय संघासाठी अभिमानास्पद ठरले.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

३५० किलो वजन उचलत उत्कृष्ट कामगीरी (Asian Powerlifting Championships)

मिश्रा यांनी महिलांच्या सिनियर तसेच मास्टर गटात प्रत्येकी सुवर्णपदक पटकावत बाजी मारली. अत्यंत काट्याच्या स्पर्धेत ३५० किलोपर्यंत वजन उचलत त्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्याची चमकदार प्रात्यक्षिके दिली. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे त्यांची जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड देखील झाली आहे. या चमकदार कामगिरीमागे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अनुराधा मिश्रा प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या देखरेखीखाली सराव करतात. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा झेंडा उंचावला आहे. मिश्रा यांना स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताबही मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनुराधा मिश्रा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.