Assam Jumma Break : आसाममध्ये (Assam) मागील काही दिवसांपासून वेगळे राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आसाम सरकारने विविध निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanat Biswa Sarma) यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. आसाममधील मुस्लिम आमदारांना नमाज (Namaj) अदा करण्यासाठी दर शुक्रवारी मिळणाऱ्या दोन तासांची सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. आमदारांना नमाज अदा करण्यासंदर्भातील सुट्टीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. नवीन माहितीनुसार, यापुढे ही दोन तासांची सुट्टी मिळणार नाही.
नक्की वाचा : ‘मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो’- नरेंद्र मोदी
विधानसभेची उत्पादकता वाढवण्यासाठी आसाम सरकारचा निर्णय (Assam Jumma Break)
“आसाम विधानसभेची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि राज्यावरील वसाहतीचे ओझे दूर करण्याच्या उद्देशाने येथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुम्मासाठी दर शुक्रवारी सभागृहाचे कामकाज २ तासांसाठी तहकूब करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. ही प्रथा १९३७ मध्ये मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी सुरू केली होती. भारतातील प्राचीन धर्मनिरपेक्ष मूल्ये जपण्याच्या या प्रयत्नासाठी आसाम विधानसभेच्या अध्यक्षांचे आणि सन्माननीय सदस्यांचे आभार”, असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे.
अवश्य वाचा : अभिनेते मकरंद अनासपूरे,सिद्धार्थ जाधव खेळणार ‘एक डाव भुताचा’,चित्रपटाचे पोस्टर होणार प्रदर्शित
आमदारांना दर शुक्रवारी नमाजसाठी मिळणारी सुट्टी बंद (Assam Jumma Break)
आसाम विधानसभेमध्ये दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी दुपारी २ तासांची तासांची सुट्टी देण्यात येत होती. ही पंरपरा ब्रिटिशकालीन परंपरा होती, असं सांगितलं जातं. या दोन तासांच्या वेळेत दर शुक्रवारी मुस्लिम आमदार नमाज अदा करत होते. मात्र, आसाम सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर यापुढे ही सुट्टी त्यांना दिली जाणार नाही.